Posts

Showing posts from 2015

See you tomorrow zindagi..

See you tomorrow zindagi आज जरा बसतो एकटाच, बराच काळ गेला मधे, माझे मला भेटुन.    पहाटेच सोनेरी ऊन्ह चेहर्‍यावर घ्यायचय. उगाचच डोळे मिटून बसुन राहायचय आंघोळ झाल्यावर सुद्धा. घड्याळाच्या काट्याकडे न बघता चहा प्यायचाय.       पुस्तकाच्या ढिगारयात एखाद आवडतं पुस्तक शोधायचय. आवडलेली एखादी कविता पुन्हा वाचायचीय.      जुन्या फोटोंमध्ये स्वतःला मोठं होताना पाहायचय. एखाद्या फोटो जवळ थांबुन त्या क्षणाला पुन्हा जगायचय. जरास डोळ्यात पाणीही आणायचय... त्या सगळ्या क्षणासाठी, जिथे डोळ्यात पाणी आणायला वेळ नव्हता. माझ्या आयुष्यातला एक दिवस देना मला असा, ज्यात माझी मर्जी असेल. अरे हा, महत्वाचे राहिले ! समुद्र किनारी एकटच बसुन मस्त एखाद आवडत गाणं मोठ्या आवाजात गायचय. बघ जमतेय का द्यायला एक दिवसाची सुट्टी. किशोर...

अंतरीच्या कळा..

अंतरीच्या नाना कळा ना ना म्हणूनही उठतात, दारु पिऊन पिऊन विसरलेल्या जुन्या आठवणी आमच्या हातात पत्रिका ठेवतात.  आता पुन्हा एकवार फोन करावा हळुवार, मित्राने म्हणाव एकदम सिरियस होवुन सोड ना भावा, तु सांग आज कुठला बार. इतक्या अतिव दुःखातही खिसा हसतो आमच्यावर खदखदून, मग आपणच तत्वज्ञानी होउन म्हणाव नको रे, काय चिल्लर गोष्टीना धरायच बसुन. मग फोनच्या पलीकडे हसल्याचा भास  आणी अलीकडे काही तुटल्याचा..   चिल्लर चाचपत मग तसच चालायच, टपरी पकडुन कोपर्‍यातली      सिगरेटच्या धुरात जळायच. एक एक झुरका राख राख करायची फुप्फुसाच्या कप्प्यात दुःखांची चिता पेटवायची.  किशोर...

चुकलेला...

मना रे न को ना इतका विचार असतात काही नाती अशीच काही शिकवून निघुन जाणारी.      आयुष्य असच असत कधी कुणी चुकत कधी आपण चुकतो कटु क्षण पचवायचे चुकीचे क्षण विसरून पुढे चालायचे. कुणीतरी आपणास गमावले कुणाला आपण... वेळ खोडरबर देत नाही कधी नाहीतर सगळीच नाती निर्मळ राहिली नसती का?    एक चुकलेला किशोर...

मनात चोर तुझ्याही...

पाऊस आला अंग भिजलं मनात आला विचार, चांगला नक्कीच म्हणता येणार नाही पण वाईट तरी कशाला म्हणा यार. एक छत्री आपण दोघे हातामधे तुझा हात, वाऱ्यानेही मग गंमत करावी जवळ तु यावीस आपोआप. पावसात तु भिजु नयेस म्हणून मी तुला बिलगाव, तुही मग ओलेत्या अंगाने हळुच गाली लाजाव. छत्री फक्त नावापुरती भिजलेले आपण दोघेही, संकोचाचे पडदे उगाच! मनात चोर तुझ्याही... मनात चोर तुझ्याही. किशोर...

विरहाच्या वळणावरती.

आठवशील ना मला कधीतरी धुंद धुक्याच्या सकाळी नाव अजून आहे ना माझे तुज हसर्‍या ओठांच्या पाशी. विसरून तुला दिस गेला  नाही अन रात उशाशी बसुन राही हात रिकामा अजुन तुझ्याविन मन माझे तुझी वाट पाही. येशील तू पुन्हा एकदा हरवलेले माझे प्रेम घेऊनी मी आजही तिथेच आहे विरहाच्या त्या वळणावरती. किशोर...

असच काहीतरी सुचलेल.

आज काही करताना भविष्याचा विचार करावा कारण आजची चुक भविष्याला जायबंदी करते. येणारा प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो पण गमावलेली संधी मात्र कधीतरी काही दरवाजे कायमचे बंद करते. विसर पडण्याचं वरदान हे तुम्हाआम्हाला आहे काही कटू क्षण म्हणूनच आज आठवत नाही. पण एखादी सुकलेली जखम मनातली वेदनेपेक्षा कमी त्रास देत नाही. कोमेजल्या फुलाला पाहून मन विचारात पडलं देवाचे पायी पडलं म्हणून कोमेजलं तरी निर्माल्य ठरलं. माणसांच्या बाबतीत मात्र असं काही होत नाही... भरारी मारताना कोसळलेला कोणी प्रयत्नांच्या पायी पडलेला निर्माल्य का ठरू नये. किशोर...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....

मला कधीच फरक पडत नाही. पेपरात अशा बातम्या रोजच येतात. वयाचाच काय तो फरक. एखादी 5 वर्षाची तर कुणी 60 वर्षाची. त्यात काय एवढं मनावर घ्यायच.... असणार एखादी उनाड म्हणूनच तर तिला शिक्षा मिळाली. गेली अपरात्री बाहेर म्हणून तर अस घडलं घराच्या चार भिंतीत राहिली असती तर सुरक्षित असती. तिला धडा शिकवला कुणीतरी. त्यात काय एवढं मनावर घ्यायच.... कशाला उगाच मनावर घ्यायचं! खर ना? किशोर...

मनाची भडास....

कुठलीच नाती अपेक्षा किंवा स्वार्थ असल्या शिवाय जुळत नाहीत का ? हा प्रश्‍न पडावा असे काही क्षण जवळुन बघितले.  निर्व्याज प्रेम, निखळ मैत्री हे शब्द पुस्तकात वाळवी खात पडलेत. इथे सहानुभूती देणारा खांद्यावरचा हात कसली ईच्छा धरून बसलाय सांगता येत नाही. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे गाणारा प्रशांत दामले आठवला तर आता पुर्वी सारखी मजा येत नाही, उलट दुसर्‍याच्या दुःखातच आपल सुख असत अशी म्हणणाऱ्या लोकांचे चेहरे दिसु लागतात. हे सगळं मी का लिहितोय तर कारण एकच, ह्या अनुभवा मुळे माझ्यात  आलेला कडवटपणा मला नकोय. मग तो असा लिहुन बाहेर काढून टाकणं गरजेच होत. किशोर...

तराजू...

अस्वस्थ स्वप्न आज शेवटी तुटलं, मग जाग आली अन सुटका केली स्वताची. कारणे सगळीच चाचपुन पाहिली, पण कारण काहीच उमगलं नाही. नंतर वाटलं कशाला कारण हवय? सही गलतचा हिसाब करणारा वाणी तराजू तोलतोय. एक पारड जड करत आपल्याला जोखतोय. माझी किंमत ठरवून त्याची झाली की एक भाव मीही करेन, पारडय़ात टाकलेल्या प्रत्येक वजनाची किंमत वसुल करेन. किशोर...