मनात चोर तुझ्याही...

पाऊस आला
अंग भिजलं
मनात आला विचार,

चांगला नक्कीच म्हणता येणार नाही
पण वाईट तरी कशाला म्हणा यार.

एक छत्री
आपण दोघे
हातामधे तुझा हात,

वाऱ्यानेही मग गंमत करावी
जवळ तु यावीस आपोआप.

पावसात तु भिजु नयेस
म्हणून मी तुला बिलगाव,

तुही मग ओलेत्या अंगाने हळुच गाली लाजाव.

छत्री फक्त नावापुरती
भिजलेले आपण दोघेही,

संकोचाचे पडदे उगाच!
मनात चोर तुझ्याही...
मनात चोर तुझ्याही.

किशोर...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....