Posts

Showing posts from 2017

QWERTY किपॅडची कविता...

धरून आहे का हे तर्कशुद्ध नियमानुसार माहीत नाही, पण मलातरी वाटत... असेल तरी ते जास्त महत्वाचे नाही.  तु फक्त लिहीत राहा, आणि मग त्या शब्दांना कुणीतरी दाद दिली.. तर खांद्यावर घेऊन मनसोक्त नाचत रहा त्या कौतुकाला.     फार सुंदर आहे कविता तुझी म्हणालच कुणी, डोळ्यात पाणी आलच कुणाच्या, तर ते पाणी बंद करून घे मुठीत.. घरी आल्यावर त्याला सोडून दे तुझ्या जवळ रडणार्‍या आठवणी जवळ. हसर्‍या काही ओळी उतरल्या कागदावर, तर दचकून जागा नको होउस.  अवचित आलेला पाऊस असेल तो, आला तसा निघून जाईल. संपर्क साधावा असे आवाहन करण्याच्या  फंदात मात्र पडु नकोस,             असा पाउस घेऊन येणारे ढग जमा झाले तरी बरसतीलच ह्याचा काही भरवसा नाही. किशोर...

पर्याय..

पर्याय.. जुना मित्र भेटला काल विचारल काय चाललंय आजकाल.   हसत म्हणाला आयुष्य नेइल तिथे जातोय        येणारा प्रत्येक दिवस हसत घालवतोय. मला आपलं उगाचच त्याची दया आली का माझीच एखादी सल मी त्याच्यात पाहिली. खांद्यावरचा हात हातात घेऊन तो म्हणाला अरे वेड्या रडायला इथे वेळ आहे कुणाला. निसटलेल आपल नव्हतच म्हणायच     ओंजळीत उरलेलं मात्र जपुन ठेवायच. त्याच्या दुःखाच कारण विचाराव असही वाटल पण त्याच्या हसर्‍या चेहर्‍या समोर आपलं सगळं खुजं भासलं. त्याची लोकल धडधडत आली माझा निरोप घेऊन त्यांने ती पकडली. दोघांची दशा कदाचित सारखी पण जाण्याची दिशा वेगळी.                एकाच वाटेचा प्रवास दोघांचा फरक फक्त निवडलेल्या पर्यायाचा.       किशोर...

उत्तर...

डोकावून पहा माझ्यात कुठेतरी खोलवर मी बसलोय सापडलो तर जवळ घे मला विचारून पहा कसा आहेस... धडपड सुरू होईल त्याची अजुनच खोल उतरण्याची हात देऊन पहा सांग त्याला तु आहेस... प्रश्न बनुन उभा नको राहुस त्याच्या समोर कधीतरी उत्तर बनुन बघ. मी खुपदा बोललो त्याच्याशी पण त्याला हवं ते उत्तर माझ्याकडे नसेल... किशोर...