पर्याय..

पर्याय..

जुना मित्र भेटला काल
विचारल काय चाललंय आजकाल.  
हसत म्हणाला
आयुष्य नेइल तिथे जातोय       
येणारा प्रत्येक दिवस हसत घालवतोय.

मला आपलं उगाचच त्याची दया आली
का माझीच एखादी सल मी त्याच्यात पाहिली.

खांद्यावरचा हात हातात घेऊन तो म्हणाला
अरे वेड्या रडायला इथे वेळ आहे कुणाला.

निसटलेल आपल नव्हतच म्हणायच    
ओंजळीत उरलेलं मात्र जपुन ठेवायच.

त्याच्या दुःखाच कारण विचाराव असही वाटल
पण त्याच्या हसर्‍या चेहर्‍या समोर आपलं सगळं खुजं भासलं.

त्याची लोकल धडधडत आली
माझा निरोप घेऊन त्यांने ती पकडली.

दोघांची दशा कदाचित सारखी
पण जाण्याची दिशा वेगळी.         
     
एकाच वाटेचा प्रवास दोघांचा
फरक फक्त निवडलेल्या
पर्यायाचा.      

किशोर...

Comments

  1. Zagana shikavnara drishtikon tevhdech sahaz vyakt honare shabd ..khup sunder

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....