Posts

Showing posts from 2014

दोष...

मातीचे ढिगारे शवांचे मनोरे त्यावर नाचतेय हिंसा हातात माणुसकीच शीर धरून.        कुठला धर्म                      कसले देव फक्त रंगाचे झेंडे आवळून बांधले जातात मनामनात करकचून.    मृत शरीर छिन्न आत्मा पण चिमुरड्या जीवाचे रेंगाळत उरलेले श्वास  तिथे. एक प्रश्न एक आक्रोश विचारत असतील, नक्की दोष असे काय आमचा इथे. किशोर...

एक कविता मित्रासाठी...

खेळताना पडलो तर समोर उभा राहून हसलास,    माझ्या डोळ्यात पाणी पाहून मात्र जवळ येऊन बसलास.      चिडवताना एकमेकाला कधीतरी अंगावर आलास, पण दुसर्‍या कुणाला माझ्याकडे फिरकू नाही दिलास. हसरे क्षण सारे तुझे माझ्यासवे जगलास, माझ्या दुःखात खांद्यावर डोकं ठेऊन रडलास. जग जेव्हा मला बरवाईट जोखण्यात व्यस्त होतं, तुझ्याकरता मी फक्त तुझ्यासवे असणच मस्त होतं. हि कविता वाचून नक्कीच माझ्यावर हसशील, खुश होवुन मला नौटंकी साला म्हणशील.    कसाही असेन कुठेही जाईन पण एक नाव तुझेमाझे जोडलेलच सांगेन. किशोर...

विरह....

तु असतेस बाजूला तर जगाची गरज भासत नाही नसताना तु मात्र जगात काहीच आपलस राहत नाही. किलबिल करणार घरकुल भकास होवून जात घरभर धावणारी पाउलं मनात वाजत राहतात. असताना जवळ कधी जाणवत नाहीस पण खुप आठवण यायला तुझी अस कधीतरी दुर रहाव लागत.   माहिती नाही काय लिहिलय पण प्रत्येक शब्दात मात्र तुलाच पाहिलय. ...किशोर

नाती...

गतकाळाच्या ओंजळीमधली काही हळवी नाती, काही तुटलेली अन काही तोडलेली. माझ्या नजरेने कधी जवळुन पाहिलेली, तरीही आता किती अनोळखी वाटणारी. काही नात्यानी दिलेली ओळख पुसून गेलेली, पण ती नावं कानी पडता चेहरा हसरा करणारी. काही नाती श्वासासारखी सतत उरात वाहणारी... अलग काही केल्या न करता येणारी. अशी काही रक्ताची अन काही विरक्ताची, आपल्या सगळ्यांच्या ओंजळीत उरुन राहिलेली.... गतकाळाच्या ओंजळी मधली काही हळवी नाती. .... किशोर

निषेध प्रेमाचा...

आज एक अर्ज करायचाय देवाला काही प्रश्न आहेत सोडवायला प्रेम नावाची गंमत   ज्यात तुला खुप मजा येते Fall in love म्हणायचं   आणि मग तोंडावर पाडायला. हरखून गेलेला तो तिच्या एका ओझरत्या नजरेने स्वप्नांचे इमले दोघांचे अगदी सातवे आसमानला पोहोचलेले. सतराशे साठ जुगाड मग चालू होतात सगळ्यांचे कधी मित्र मैत्रीणी तर कधी त्या दोघांचे. जोड्या जोड्या खेळतोस का वर बसून असा प्रश्न पडावा इतक्या सहज तोडतोस स्वप्नं आणि मग दुसरा डाव मांडावा. मग शाहरुखचे पिक्चर  hit होतात आणि अब तेरे बिन गात नाक्यावर सिगारेटी lit होतात.    तुझ्या credits मधे मात्र एक डायलॉग हुकमी असतो देव जे काही करतो त्यात आपल्या नशिबी कुणीतरी best असतो.                                                 दयाघना माझी बुद्धी खुप छोटी आहे  आणि तुझी लीला अगम्य आहे पण माझ्यासारख्या पामराला फक्त एक गोष्ट कळते. घ्यायचय तर देवु नकोस नाहीतर एकदाच दे जी माझ्यासाठी best आहे.   ..... किशोर

आम्ही कवी.

आशयाविना लिहिणे आणि त्या लिहिण्याला कविता म्हणणे, दुनियेच्या लेखी आम्ही कवी असेच काहीसे दिवाने. शुन्यामध्ये बघत राहणे पेनाची शाई अन कागद नासवणारे, जटिल शब्दाची जुळवाजुळव अन यमकाची बाराखडी रचणारे. वेड लागण्यापुर्वीची कि नंतरची परिस्थिती असते, आमच्या लिहिण्याला ना काही अर्थ असतो ना कुणाला कुतूहल असते. पण कुणाला कधी कळाव अन मनाची गुपितं उघडावीत, अस काही आम्हा कलंदराना वाटतही नसतं. कारण त्या गुपिताना जपताना आयुष्य कमी पडलेले आणि काही मनाच्या खोल डोहाचा तळ कधीच न सापडलेले असे या जगात कुणीच नसते. फरक काय तो इतकाच की आमच्या चेहर्‍यावरचे रंग, मनाइतकेच खरे असतात. आणि कविता ही त्यांची रंगीत प्रतिमा असते. ..... किशोर      

पुनर्भेट

आपणास आपलां सप्रेम नमस्कार  साधारण किती दिवस झाले तुला भेटून, दिवस कि वर्षे माहिती नाही पण चेहरा ओळखीचा आहे खरा.  आधी कुठे तरी सागर काठाला उभा दिसायचास, काय करायचास माहिती नाही पण मला पाहिल्यावर हसायचास बरा.  काय आणि किती बोलायचो कुणास ठावूक, विषय काय असायचा माहिती नाही पण निघावेसे वाटायचे मात्र निश्चित नाही.  अधून-मधून दिसायचास कधी तरी, घरा-दारात, मित्रात, एखाद्या जुन्या तसबिरीच्या आत.  विलक्षण शांत भासायाचास तू, का? माहिती नाही! पण करूण खचितच नाही.  आणि अकस्मात भेटायचा बंद झालास तू, रागावलास माझ्यावर! माहिती नाही पण मौन तुझे ऐकू यायचे कधीतरी.  मी भावविवश होवून हाकारायचो तुला, तू लपून पाहायचास का माहिती नाही पण दात विचकून हसायचं कुणीतरी.  रक्ताळून आलेली एखादी जुनी जखम  मलिन पडलेल्या देहावरच झिरमिरीत रेशम  कुणालाच गाता न आलेल्या नश्वर आयुष्याची सरगम  सगळ्या सगळ्या गोष्टी करताना आठवयचास तु.  आणि आज का असा  समोर उभा ठाकलास तू…… माहिती नाही पण  एकाकी प्रवाश्याची हरवलेली दिशाच वाटलास तु.  … किशोर