नाती...

गतकाळाच्या ओंजळीमधली काही हळवी नाती,
काही तुटलेली अन काही तोडलेली.

माझ्या नजरेने कधी जवळुन पाहिलेली,
तरीही आता किती अनोळखी वाटणारी.

काही नात्यानी दिलेली ओळख पुसून गेलेली,
पण ती नावं कानी पडता चेहरा हसरा करणारी.

काही नाती श्वासासारखी
सतत उरात वाहणारी...
अलग काही केल्या न करता येणारी.

अशी काही रक्ताची अन काही विरक्ताची,
आपल्या सगळ्यांच्या ओंजळीत उरुन राहिलेली....
गतकाळाच्या ओंजळी मधली काही हळवी नाती.

.... किशोर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....