Posts

अक्षरे मनांतली

 आजूबाजूच्या अनुभवातून सुचलेल्या, काहीतरी  कागदावर खरडत असताना जन्मलेल्या अक्षरातून तयार झालेल्या काही लघुकथा. यात काही भावना आहेत तर काही घटना आणी  त्याच्या अवतीभोवती रचलेली कथा. एक प्रयत्न तुम्हा वाचकांसमोर काही मांडण्याचा. नक्की आवडतील खात्री आहे अशी काही अक्षरे मनांतली . 50 प्रतीना वाचक लाभला, नवीन 100 प्रती वाचकांसाठी तयार आहेत. ज्यांनी विश्वास दाखवला त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि  नवीन लोकांना नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. ज्यांनी वाचायला सुरू केले असेल त्यांना विनंती की आपला अभिप्राय Amazon वर नक्की लिहा.  - किशोर अशोक मंडले Amazon ची लिंक :  https://www.amazon.in/dp/B07N8Y4HXY/ref=cm_sw_r_wa_apa_i_evQvCbNZKF8YZ

QWERTY किपॅडची कविता...

धरून आहे का हे तर्कशुद्ध नियमानुसार माहीत नाही, पण मलातरी वाटत... असेल तरी ते जास्त महत्वाचे नाही.  तु फक्त लिहीत राहा, आणि मग त्या शब्दांना कुणीतरी दाद दिली.. तर खांद्यावर घेऊन मनसोक्त नाचत रहा त्या कौतुकाला.     फार सुंदर आहे कविता तुझी म्हणालच कुणी, डोळ्यात पाणी आलच कुणाच्या, तर ते पाणी बंद करून घे मुठीत.. घरी आल्यावर त्याला सोडून दे तुझ्या जवळ रडणार्‍या आठवणी जवळ. हसर्‍या काही ओळी उतरल्या कागदावर, तर दचकून जागा नको होउस.  अवचित आलेला पाऊस असेल तो, आला तसा निघून जाईल. संपर्क साधावा असे आवाहन करण्याच्या  फंदात मात्र पडु नकोस,             असा पाउस घेऊन येणारे ढग जमा झाले तरी बरसतीलच ह्याचा काही भरवसा नाही. किशोर...

पर्याय..

पर्याय.. जुना मित्र भेटला काल विचारल काय चाललंय आजकाल.   हसत म्हणाला आयुष्य नेइल तिथे जातोय        येणारा प्रत्येक दिवस हसत घालवतोय. मला आपलं उगाचच त्याची दया आली का माझीच एखादी सल मी त्याच्यात पाहिली. खांद्यावरचा हात हातात घेऊन तो म्हणाला अरे वेड्या रडायला इथे वेळ आहे कुणाला. निसटलेल आपल नव्हतच म्हणायच     ओंजळीत उरलेलं मात्र जपुन ठेवायच. त्याच्या दुःखाच कारण विचाराव असही वाटल पण त्याच्या हसर्‍या चेहर्‍या समोर आपलं सगळं खुजं भासलं. त्याची लोकल धडधडत आली माझा निरोप घेऊन त्यांने ती पकडली. दोघांची दशा कदाचित सारखी पण जाण्याची दिशा वेगळी.                एकाच वाटेचा प्रवास दोघांचा फरक फक्त निवडलेल्या पर्यायाचा.       किशोर...

उत्तर...

डोकावून पहा माझ्यात कुठेतरी खोलवर मी बसलोय सापडलो तर जवळ घे मला विचारून पहा कसा आहेस... धडपड सुरू होईल त्याची अजुनच खोल उतरण्याची हात देऊन पहा सांग त्याला तु आहेस... प्रश्न बनुन उभा नको राहुस त्याच्या समोर कधीतरी उत्तर बनुन बघ. मी खुपदा बोललो त्याच्याशी पण त्याला हवं ते उत्तर माझ्याकडे नसेल... किशोर...

पुन्हा एकदा...

पुन्हा एकदा..... आभाळ भरून पाणी उतू जातय, सरीवर सरींनी सगळं शहर भिजतय.   मी निघालो घरातुन,     हातात छत्री उगाचच घुटमळत राहते. छत्री बाहेरचा पाऊस खुणावतो, मी मात्र कोरडाच चालत राहतो. मन त्याच्याशी बोलु लागतं मी प्लॅटफॉर्म वर उभा असतो. थोडी गर्दीची देवाणघेवाण होते आणी मी लोकलमधला होतो.                  तो शोधत मला आत येतो,      मी खिडकी बंद करून घेतो.   खडखडाट करत स्टेशनं मागे जातात, माणसही तशीच कमी जास्त होतात. ट्रेन हलकी होत जाते, पाउलं उगाचच जड होतात.    ऑफिसच दार बंद असावं, असे भलते सलते भास होतात. रांगत रांगत चालताना ओळखीच्या रस्त्यावर  पाय साथ सोडुन देतात, मग मी आणी ऑफिस मधे एक भला मोठ्ठा पाउस ऊभा राहतो. छत्रीतुन मी दोघांकडे केविलवाणा पाहतो. आणि पुन्हा एकदा तुच जिंकतोस.... किशोर...

See you tomorrow zindagi..

See you tomorrow zindagi आज जरा बसतो एकटाच, बराच काळ गेला मधे, माझे मला भेटुन.    पहाटेच सोनेरी ऊन्ह चेहर्‍यावर घ्यायचय. उगाचच डोळे मिटून बसुन राहायचय आंघोळ झाल्यावर सुद्धा. घड्याळाच्या काट्याकडे न बघता चहा प्यायचाय.       पुस्तकाच्या ढिगारयात एखाद आवडतं पुस्तक शोधायचय. आवडलेली एखादी कविता पुन्हा वाचायचीय.      जुन्या फोटोंमध्ये स्वतःला मोठं होताना पाहायचय. एखाद्या फोटो जवळ थांबुन त्या क्षणाला पुन्हा जगायचय. जरास डोळ्यात पाणीही आणायचय... त्या सगळ्या क्षणासाठी, जिथे डोळ्यात पाणी आणायला वेळ नव्हता. माझ्या आयुष्यातला एक दिवस देना मला असा, ज्यात माझी मर्जी असेल. अरे हा, महत्वाचे राहिले ! समुद्र किनारी एकटच बसुन मस्त एखाद आवडत गाणं मोठ्या आवाजात गायचय. बघ जमतेय का द्यायला एक दिवसाची सुट्टी. किशोर...

अंतरीच्या कळा..

अंतरीच्या नाना कळा ना ना म्हणूनही उठतात, दारु पिऊन पिऊन विसरलेल्या जुन्या आठवणी आमच्या हातात पत्रिका ठेवतात.  आता पुन्हा एकवार फोन करावा हळुवार, मित्राने म्हणाव एकदम सिरियस होवुन सोड ना भावा, तु सांग आज कुठला बार. इतक्या अतिव दुःखातही खिसा हसतो आमच्यावर खदखदून, मग आपणच तत्वज्ञानी होउन म्हणाव नको रे, काय चिल्लर गोष्टीना धरायच बसुन. मग फोनच्या पलीकडे हसल्याचा भास  आणी अलीकडे काही तुटल्याचा..   चिल्लर चाचपत मग तसच चालायच, टपरी पकडुन कोपर्‍यातली      सिगरेटच्या धुरात जळायच. एक एक झुरका राख राख करायची फुप्फुसाच्या कप्प्यात दुःखांची चिता पेटवायची.  किशोर...