See you tomorrow zindagi..

See you tomorrow zindagi
आज जरा बसतो एकटाच,
बराच काळ गेला मधे, माझे मला भेटुन.   

पहाटेच सोनेरी ऊन्ह चेहर्‍यावर घ्यायचय.

उगाचच डोळे मिटून बसुन राहायचय आंघोळ झाल्यावर सुद्धा.

घड्याळाच्या काट्याकडे न बघता चहा प्यायचाय.      

पुस्तकाच्या ढिगारयात एखाद आवडतं पुस्तक शोधायचय.

आवडलेली एखादी कविता पुन्हा वाचायचीय.     

जुन्या फोटोंमध्ये स्वतःला मोठं होताना पाहायचय.

एखाद्या फोटो जवळ थांबुन त्या क्षणाला पुन्हा जगायचय.

जरास डोळ्यात पाणीही आणायचय... त्या सगळ्या क्षणासाठी, जिथे डोळ्यात पाणी आणायला वेळ नव्हता.

माझ्या आयुष्यातला एक दिवस देना मला असा, ज्यात माझी मर्जी असेल.

अरे हा, महत्वाचे राहिले !
समुद्र किनारी एकटच बसुन मस्त एखाद आवडत गाणं मोठ्या आवाजात गायचय.

बघ जमतेय का द्यायला
एक दिवसाची सुट्टी.

किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....