दोष...

मातीचे ढिगारे
शवांचे मनोरे
त्यावर नाचतेय हिंसा हातात माणुसकीच शीर धरून.  
    
कुठला धर्म                     
कसले देव
फक्त रंगाचे झेंडे आवळून बांधले जातात मनामनात करकचून.   

मृत शरीर
छिन्न आत्मा
पण चिमुरड्या जीवाचे रेंगाळत उरलेले श्वास  तिथे.

एक प्रश्न
एक आक्रोश
विचारत असतील, नक्की दोष असे काय आमचा इथे.

किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....