त्यात काय एवढं मनावर घ्यायच....

मला कधीच फरक पडत नाही. पेपरात अशा बातम्या रोजच येतात. वयाचाच काय तो फरक. एखादी 5 वर्षाची तर कुणी 60 वर्षाची.
त्यात काय एवढं मनावर घ्यायच....

असणार एखादी उनाड
म्हणूनच तर तिला शिक्षा मिळाली.
गेली अपरात्री बाहेर
म्हणून तर अस घडलं
घराच्या चार भिंतीत राहिली असती तर सुरक्षित असती.
तिला धडा शिकवला कुणीतरी.
त्यात काय एवढं मनावर घ्यायच....

कशाला उगाच मनावर घ्यायचं!
खर ना?

किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...