Posts

Showing posts from December, 2014

दोष...

मातीचे ढिगारे शवांचे मनोरे त्यावर नाचतेय हिंसा हातात माणुसकीच शीर धरून.        कुठला धर्म                      कसले देव फक्त रंगाचे झेंडे आवळून बांधले जातात मनामनात करकचून.    मृत शरीर छिन्न आत्मा पण चिमुरड्या जीवाचे रेंगाळत उरलेले श्वास  तिथे. एक प्रश्न एक आक्रोश विचारत असतील, नक्की दोष असे काय आमचा इथे. किशोर...

एक कविता मित्रासाठी...

खेळताना पडलो तर समोर उभा राहून हसलास,    माझ्या डोळ्यात पाणी पाहून मात्र जवळ येऊन बसलास.      चिडवताना एकमेकाला कधीतरी अंगावर आलास, पण दुसर्‍या कुणाला माझ्याकडे फिरकू नाही दिलास. हसरे क्षण सारे तुझे माझ्यासवे जगलास, माझ्या दुःखात खांद्यावर डोकं ठेऊन रडलास. जग जेव्हा मला बरवाईट जोखण्यात व्यस्त होतं, तुझ्याकरता मी फक्त तुझ्यासवे असणच मस्त होतं. हि कविता वाचून नक्कीच माझ्यावर हसशील, खुश होवुन मला नौटंकी साला म्हणशील.    कसाही असेन कुठेही जाईन पण एक नाव तुझेमाझे जोडलेलच सांगेन. किशोर...

विरह....

तु असतेस बाजूला तर जगाची गरज भासत नाही नसताना तु मात्र जगात काहीच आपलस राहत नाही. किलबिल करणार घरकुल भकास होवून जात घरभर धावणारी पाउलं मनात वाजत राहतात. असताना जवळ कधी जाणवत नाहीस पण खुप आठवण यायला तुझी अस कधीतरी दुर रहाव लागत.   माहिती नाही काय लिहिलय पण प्रत्येक शब्दात मात्र तुलाच पाहिलय. ...किशोर

नाती...

गतकाळाच्या ओंजळीमधली काही हळवी नाती, काही तुटलेली अन काही तोडलेली. माझ्या नजरेने कधी जवळुन पाहिलेली, तरीही आता किती अनोळखी वाटणारी. काही नात्यानी दिलेली ओळख पुसून गेलेली, पण ती नावं कानी पडता चेहरा हसरा करणारी. काही नाती श्वासासारखी सतत उरात वाहणारी... अलग काही केल्या न करता येणारी. अशी काही रक्ताची अन काही विरक्ताची, आपल्या सगळ्यांच्या ओंजळीत उरुन राहिलेली.... गतकाळाच्या ओंजळी मधली काही हळवी नाती. .... किशोर