Posts

Showing posts from 2016

पुन्हा एकदा...

पुन्हा एकदा..... आभाळ भरून पाणी उतू जातय, सरीवर सरींनी सगळं शहर भिजतय.   मी निघालो घरातुन,     हातात छत्री उगाचच घुटमळत राहते. छत्री बाहेरचा पाऊस खुणावतो, मी मात्र कोरडाच चालत राहतो. मन त्याच्याशी बोलु लागतं मी प्लॅटफॉर्म वर उभा असतो. थोडी गर्दीची देवाणघेवाण होते आणी मी लोकलमधला होतो.                  तो शोधत मला आत येतो,      मी खिडकी बंद करून घेतो.   खडखडाट करत स्टेशनं मागे जातात, माणसही तशीच कमी जास्त होतात. ट्रेन हलकी होत जाते, पाउलं उगाचच जड होतात.    ऑफिसच दार बंद असावं, असे भलते सलते भास होतात. रांगत रांगत चालताना ओळखीच्या रस्त्यावर  पाय साथ सोडुन देतात, मग मी आणी ऑफिस मधे एक भला मोठ्ठा पाउस ऊभा राहतो. छत्रीतुन मी दोघांकडे केविलवाणा पाहतो. आणि पुन्हा एकदा तुच जिंकतोस.... किशोर...