अंतरीच्या कळा..

अंतरीच्या नाना कळा
ना ना म्हणूनही उठतात,
दारु पिऊन पिऊन
विसरलेल्या जुन्या आठवणी
आमच्या हातात पत्रिका ठेवतात. 

आता पुन्हा एकवार
फोन करावा हळुवार,
मित्राने म्हणाव एकदम सिरियस होवुन
सोड ना भावा, तु सांग आज कुठला बार.

इतक्या अतिव दुःखातही
खिसा हसतो आमच्यावर खदखदून,
मग आपणच तत्वज्ञानी होउन म्हणाव
नको रे, काय चिल्लर गोष्टीना धरायच बसुन.

मग फोनच्या पलीकडे हसल्याचा भास 
आणी अलीकडे काही तुटल्याचा..  
चिल्लर चाचपत मग तसच चालायच,
टपरी पकडुन कोपर्‍यातली     
सिगरेटच्या धुरात जळायच.

एक एक झुरका
राख राख करायची
फुप्फुसाच्या कप्प्यात
दुःखांची चिता पेटवायची. 

किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....