निषेध प्रेमाचा...


आज एक अर्ज करायचाय देवाला
काही प्रश्न आहेत सोडवायला
प्रेम नावाची गंमत  
ज्यात तुला खुप मजा येते
Fall in love म्हणायचं  
आणि मग तोंडावर पाडायला.

हरखून गेलेला तो
तिच्या एका ओझरत्या नजरेने
स्वप्नांचे इमले दोघांचे
अगदी सातवे आसमानला पोहोचलेले.

सतराशे साठ जुगाड
मग चालू होतात सगळ्यांचे
कधी मित्र मैत्रीणी तर कधी त्या दोघांचे.

जोड्या जोड्या खेळतोस का वर बसून असा प्रश्न पडावा
इतक्या सहज तोडतोस स्वप्नं
आणि मग दुसरा डाव मांडावा.

मग शाहरुखचे पिक्चर  hit होतात
आणि अब तेरे बिन गात नाक्यावर सिगारेटी lit होतात.   

तुझ्या credits मधे मात्र एक डायलॉग हुकमी असतो
देव जे काही करतो त्यात आपल्या नशिबी कुणीतरी best असतो.
                                               
दयाघना माझी बुद्धी खुप छोटी आहे 
आणि तुझी लीला अगम्य आहे
पण माझ्यासारख्या पामराला
फक्त एक गोष्ट कळते.

घ्यायचय तर देवु नकोस नाहीतर
एकदाच दे जी माझ्यासाठी best आहे.  

..... किशोर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....