आम्ही कवी.

आशयाविना लिहिणे
आणि त्या लिहिण्याला कविता म्हणणे,
दुनियेच्या लेखी आम्ही कवी असेच काहीसे दिवाने.

शुन्यामध्ये बघत राहणे
पेनाची शाई अन कागद नासवणारे,
जटिल शब्दाची जुळवाजुळव
अन यमकाची बाराखडी रचणारे.

वेड लागण्यापुर्वीची कि
नंतरची परिस्थिती असते,
आमच्या लिहिण्याला ना काही अर्थ असतो
ना कुणाला कुतूहल असते.

पण कुणाला कधी कळाव
अन मनाची गुपितं उघडावीत,
अस काही आम्हा कलंदराना वाटतही नसतं.

कारण त्या गुपिताना जपताना
आयुष्य कमी पडलेले
आणि काही मनाच्या खोल डोहाचा तळ
कधीच न सापडलेले असे या जगात कुणीच नसते.

फरक काय तो इतकाच की आमच्या चेहर्‍यावरचे रंग,
मनाइतकेच खरे असतात.
आणि कविता ही त्यांची रंगीत प्रतिमा असते.

..... किशोर

     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....