पुनर्भेट


आपणास आपलां सप्रेम नमस्कार 
साधारण किती दिवस झाले तुला भेटून,
दिवस कि वर्षे माहिती नाही पण चेहरा ओळखीचा आहे खरा. 

आधी कुठे तरी सागर काठाला उभा दिसायचास,
काय करायचास माहिती नाही पण मला पाहिल्यावर हसायचास बरा. 

काय आणि किती बोलायचो कुणास ठावूक,
विषय काय असायचा माहिती नाही पण निघावेसे वाटायचे मात्र निश्चित नाही. 

अधून-मधून दिसायचास कधी तरी,
घरा-दारात, मित्रात, एखाद्या जुन्या तसबिरीच्या आत. 
विलक्षण शांत भासायाचास तू,
का? माहिती नाही! पण करूण खचितच नाही. 

आणि अकस्मात भेटायचा बंद झालास तू,
रागावलास माझ्यावर! माहिती नाही पण मौन तुझे ऐकू यायचे कधीतरी. 

मी भावविवश होवून हाकारायचो तुला,
तू लपून पाहायचास का माहिती नाही पण दात विचकून हसायचं कुणीतरी. 

रक्ताळून आलेली एखादी जुनी जखम 
मलिन पडलेल्या देहावरच झिरमिरीत रेशम 
कुणालाच गाता न आलेल्या नश्वर आयुष्याची सरगम 
सगळ्या सगळ्या गोष्टी करताना आठवयचास तु. 

आणि आज का असा  समोर उभा ठाकलास तू…… माहिती नाही पण 
एकाकी प्रवाश्याची हरवलेली दिशाच वाटलास तु. 


… किशोर 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....