विरहाच्या वळणावरती.

आठवशील ना मला कधीतरी
धुंद धुक्याच्या सकाळी
नाव अजून आहे ना माझे
तुज हसर्‍या ओठांच्या पाशी.

विसरून तुला दिस गेला  नाही
अन रात उशाशी बसुन राही
हात रिकामा अजुन तुझ्याविन
मन माझे तुझी वाट पाही.

येशील तू पुन्हा एकदा
हरवलेले माझे प्रेम घेऊनी
मी आजही तिथेच आहे
विरहाच्या त्या वळणावरती.

किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....