तराजू...

अस्वस्थ स्वप्न आज शेवटी तुटलं,
मग जाग आली अन सुटका केली स्वताची.

कारणे सगळीच चाचपुन पाहिली,
पण कारण काहीच उमगलं नाही.

नंतर वाटलं
कशाला कारण हवय?

सही गलतचा हिसाब करणारा वाणी तराजू तोलतोय.
एक पारड जड करत आपल्याला जोखतोय.

माझी किंमत ठरवून त्याची झाली
की एक भाव मीही करेन,
पारडय़ात टाकलेल्या प्रत्येक वजनाची किंमत वसुल करेन.

किशोर...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....