मनाची भडास....

कुठलीच नाती अपेक्षा किंवा स्वार्थ असल्या शिवाय जुळत नाहीत का ?
हा प्रश्‍न पडावा असे काही क्षण जवळुन बघितले. 

निर्व्याज प्रेम, निखळ मैत्री हे शब्द पुस्तकात वाळवी खात पडलेत. इथे सहानुभूती देणारा खांद्यावरचा हात कसली ईच्छा धरून बसलाय सांगता येत नाही.

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे गाणारा प्रशांत दामले आठवला तर आता पुर्वी सारखी मजा येत नाही, उलट दुसर्‍याच्या दुःखातच आपल सुख असत अशी म्हणणाऱ्या लोकांचे चेहरे दिसु लागतात.

हे सगळं मी का लिहितोय तर कारण एकच, ह्या अनुभवा मुळे माझ्यात  आलेला कडवटपणा मला नकोय. मग तो असा लिहुन बाहेर काढून टाकणं गरजेच होत.

किशोर...

Comments

Popular posts from this blog

अक्षरे मनांतली

दोष...

त्यात काय एवढं मनावर घ्यायच....